विकसित भारत: आदर्श ग्रामपंचायत भोन
प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे संग्रामपूर तालुक्यातील एक प्रगतशील गाव. 'स्मार्ट गाव' संकल्पनेतून आम्ही डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत आहोत.
श्रीकृष्ण विश्वनाथ तराले
सरपंच
आमच्याबद्दल
आपल्या गावाचा गौरव आणि
भविष्यातील वाटचाल
"भोन हे गाव सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. गावाचा एकूण भौगोलिक विस्तार सुमारे ४७५.६३ हेक्टर आहे.सामाजिक वैशिष्ट्ये: गावात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील ग्रामस्थ ग्रामसभेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावच्या विकासात मोलाचा वाटा उचलतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण, अद्ययावत आरोग्य सुविधा आणि संपूर्ण स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो. विशेषतः येथील मौर्यकालीन प्राचीन स्तूप गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतो.आव्हाने: स्थानिक स्तरावर युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली राबवणे आणि शेतीसाठी शाश्वत जलसिंचन व्यवस्था करणे या आव्हानांवर ग्रामपंचायत प्रशासन सध्या युद्धपातळीवर काम करत आहे."
१,१९४
गावाची लोकसंख्या
३१०
एकूण कुटुंबे
पंचायत टीम
ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी
पर्यटन आणि संस्कृती
पाहण्यासारखी ठिकाणे
अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (Ambabarwa Sanctuary)
"भोन गावापासून जवळच सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले हे अभयारण्य 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा' एक अविभाज्य भाग आहे."
अधिक माहिती
लिंगेश्वर महादेव संस्थान, भोंन
"भोन आणि परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन व जागृत देवस्थान."
अधिक माहिती
पूर्णा नदीचा विस्तीर्ण घाट (Purna River Bank)
"निसर्गरम्य पूर्णा नदी काठ. भोन गावाच्या कुशीतून वाहणारी पूर्णा नदी आणि येथील शांत परिसर पर्यकांसाठी मुख्य आकर्षण आहे."
अधिक माहिती
ऐतिहासिक मौर्यकालीन स्तूप (Ancient Bhon Stupa)
"महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विटांचा स्तूप. इसवी सन पूर्व ३ ऱ्या शतकातील ऐतिहासिक वारसा, जो भोन गावाला जागतिक ओळख मिळवून देतो."
अधिक माहितीसंपर्क आणि सहभाग
नागरिक संवाद
७/१२
ऑनलाईन उताऱ्यासाठी
दाखले
विविध प्रकारचे दाखले
मतदार यादी
आपले नाव तपासा
चालू कामे
गावाचा विकास प्रकल्प
शाळा डिजिटल करण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल क्लासरूम आणि संगणक लॅबची सुविधा.
स्वच्छता अभियान
संपूर्ण गाव हागणदारी मुक्त (ODF) असून सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारांचे नियोजन.
शुद्ध पेयजल योजना
ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण केंद्र (RO Plant) आणि नळाद्वारे घरपोच पाणीपुरवठा.
बातम्या
गावातील घडामोडी
भोन येथील प्राचीन मौर्यकालीन स्तूपाच्या संवर्धनासाठी विशेष बैठक संपन्न.
ग्रामपंचायत भोन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्राचीन स्तूपाच्या जतनासाठी आणि पर्यटन सुविधा वाढवण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्तूपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण आणि परिसरात सौर दिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिगाव सिंचन प्रकल्प पुनर्वसन आराखड्याबाबत ग्रामस्थांशी संवाद.
जिगाव प्रकल्पामुळे होणाऱ्या भोन गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन स्थळी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जलद दुवे
महत्वाच्या सेवा व सोयी
ग्रामसभा
नोंदणी
कर भरणा
शिक्षण
आरोग्य
पाणी पुरवठा
तातडीची मदत
आणीबाणीच्या वेळी संपर्क करा
आम्ही आपल्या सुरक्षेसाठी २४/७ तत्पर आहोत.
आपत्कालीन हेल्पलाईन
२४/७ मदतीसाठी उपलब्ध
आमच्याशी संपर्क साधा
ग्रामपंचायत आपल्या
सेवेसाठी सज्ज आहे.
कार्यालय पत्ता
ग्रामपंचायत कार्यालय, भोन, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा, महाराष्ट्र – 444201
फोन नंबर
8459295960
ईमेल
bhongrampanchyat@gmail.com
शासकीय महत्वाचे दुवे
शासकीय महत्वाचे दुवे
महत्वाच्या शासकीय संकेतस्थळांचे दुवे